Thu. Oct 21st, 2021

सामना अग्रलेखातून जानकरांना टोला

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेते युतीत प्रवेश करत असून इतर पक्षातही अनेक पक्षप्रवेश करत आहेत. संजय दत्त पक्षात प्रवेश करणार असल्याचे रासप पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी म्हटलं. मात्र संजय दत्त यांनी कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सामनाने आपल्या अग्रलेखातून चांगलीच टीका केली आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे –

सिनेमावाले पक्षात आल्यामुळे धनगरांना याचा फायदा होणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय दत्त यांनी जानककरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील.

तर सलमान खान आणि मंडळी आंबेडकर–ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील.

सिने स्टार आणि इतर पक्षाचे नाव घेत सामनाच्या अग्रलेखानतून जानकरांना टोला लगावला आहे.

काय आहे जानकरांना टोला लगावणारा सामनाचा अग्रलेख ?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *