Jaimaharashtra news

‘समांतर २’ मधील स्वप्नील तेजस्विनीचा बोल्ड अवतार

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी हा आता बोल्ड अवतारात ‘समांतर २’ या वेब सिरीजमध्ये झळकला आहे. स्वप्नील जोशी आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेल्या ‘समांतर’ वेबसीरिजचा दुसरा सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या वेब सिरीजमध्ये स्वप्नीलच्या इंटिमेट सीनमुळे ही वेब सिरीज पुन्हा एक चर्चेत आली आहे. ‘समांतर २’ मधील दमदार कथानकमुळे जोरदार चर्चा ही सोशल मीडियावर आहे. परंतु, वेबसीरिजमधील एका सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘समांतर- २’ मध्ये स्वप्नील आणि तेजस्विनी बोल्ड अवतारात दिसत आहे तर वेबसीरिजमधील तेजस्विनी आणि स्वप्नीलचा इंटिमेट सीन चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

‘समांतर’ ने आपल्या उत्कृष्ट कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘समांतर’ला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर प्रेक्षक गेलं वर्षभर वेबसीरिजच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. स्वप्नीलला देखील ‘समांतर’ च्या पुढच्या भागाबद्दल विचारणा होत होती. आता ‘समांतर-२’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेबसीरिजचा दुसरा सीजनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असं दिसत आहे. त्यासोबतच स्वप्नील आणि तेजस्विनीच्या इंटिमेट सीन हे प्रेक्षकांना भावला आहे. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असा बोल्ड सीन मराठी वेबसीरिजमध्ये पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

 

तेजस्विनी आणि स्वप्नीलसोबत सई ताम्हणकरनी देखील वेबसीरिजमध्ये महत्वाची भूमिका बजावली असून यात सई ही बिंदास भूमिकेत पडद्यावर झलकली आहे. सई, तेजस्विनी आणि स्वप्नीलने यापूर्वी ‘तू ही रे’ चित्रपटात काम केलं होतं. आता त्यानंतर या वेबसीरिजमध्ये ते एकत्र झळकत आहेत. ही वेबसीरिज एम एक्स प्लेयरवर प्रदर्शित करण्यात आली आहे. शिवाय प्रेक्षकांची मन जिंकण्यात वेबसीरिज यशस्वी ठरली आहे. चित्रपटगृह बंद असल्यामुळे प्रेक्षक हे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. त्याचा फायदा वेबसीरिजला होताना दिसत आहे. वेबसीरिजमधील तेजस्विनी आणि स्वप्नीलची जोडीही हिट ठरत आहे.

Exit mobile version