Wed. Nov 25th, 2020

GSTमुळे मासिक पाळी महाग

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळतेय ती 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीची. प्रत्येक राज्यात विशेष अधिवेशन घेऊन जीएसटी विधेयकाचा मार्ग सुकर करण्यात

येतोय.

 

या जीएसटीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार असून, चैनीच्या काही वस्तू महाग होणार आहेत. मात्र, या जीएसटीमुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

एकीकडे महिलांच्या मेकअपच्या वस्तू स्वस्त होत असताना. दुसरीकडे मासिक पाळी दरम्यान वापरायच्या सॅनिटरी नॅपकिन मात्र महाग झाल्या आहेत.

 

सॅनिटरी नॅपकिनवर तब्बल 14.5% इतका कर आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के कर लावण्यात आला आहे.

 

एकिकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा देणारं केंद्र सरकार अशा निर्णयांमुळे स्वत:च्याच घोषणांना हरताळ फासू लागलं आहे. त्यामुळे या जीएसटीच्या वरवंट्यातून

महिलांच्या आरोग्यदायी गोष्टी करमुक्त कराव्या अशा मागण्या जोर धरू लागल्या आहे.

 

केवळ दिल्ली सरकारचा अपवाद वगळता, देशातील बहुतांश राज्यात जीएसटीमुळे महिलांची मासिक पाळी महाग झाली आहे. दिल्ली सरकारने त्यांच्या अखत्यारित हा

कर 5 टक्क्यांपर्यंत खाली आणत, महिलांना थोड्याफार प्रमाणात का होईन पण दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *