Fri. Feb 21st, 2020

सांगलीतील ‘या’ हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबईत वडापावमध्ये मेलेली पाल आणि आईस्क्रीममध्ये मेलेलं झुरळ आढळ्यानंतर आता मसाला उपिटमध्ये झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील नवरत्न हॉटेलमध्ये घडला आहे.

सांगलीतील निलेश चौगुले हा तरुण आपल्या वडिलांसोबत या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेला असताना त्यानी मागवलेल्या मसाला उपिटच्या डिश मध्ये त्यांना झुरळ आढळून आले.

याबाबत त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला ही बाब कळवली असता त्याने उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप चौगुलेंनी केला आहे.

दरम्यान ही बाब चौगुले यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला कळवली असता सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले आणि अन्न सुरक्षा अधिकारी एस वी हिरेमठ यांनी आपल्या पथकासह हॉटेलची तपासणी करून ज्या उपिटमध्ये झुरळ दिसून आले त्या उपिटचे नमुने तपासणीसाठी घेतले आले असून प्रयोगशालेसाठी हे नमुने पाठवण्यात आले आहेत.

तसेच हॉटेलच्या किचन विभागाची देखील अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी केली असता किचन मध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि झुरळे आढळून आली.

यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने या नवरत्न हॉटेलला किचन परवाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *