उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना लाच घेताना अटक

सांगली : सांगलीत उपजिल्हाधिकारी आणि तिघांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या महिला उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडेसह तीन जणांना 5 हजारांची लाच घेताना अटक केली. सांगलीच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडेंसह त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक आणि लिपिकाचा समावेश आहे. स्वाती शेंडे या एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
एका अर्जदाराकडे कनसेट प्रमाणपत्रासाठी उपजिल्हाधिकारीसह दोघांनी 5 हजाराची मागणी केली होती. यानंतर त्या अर्जदाराने या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. यानंतर एसीबीने सापळा रचून यां तिघांना रंगेहात पकडलं.
दरम्यान महिला उपजिल्हाधिकाऱ्यालाच लाच घेताना रंगेहात सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडालीय.