Mon. Aug 10th, 2020

कांद्याचे भाव घसरले

सांगली : कांद्याचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडले होते. पण आता याच कांद्याचे दर थोड्या प्रमाणात घसरले आहेत. प्रति किलो 200 रुपयापर्यंत पोहचलेल्या कांद्याचे दर कमी झाले आहेत. सांगलीत कांदा 160 रुपयांवरुन 100 रुपयांवर उतरला आहे.

सांगलीच्या बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे. या वाढलेल्या आवकमुळे कांद्यांच्या दरात 40 ते 50 रुपयांनी घसरण झाली आहे. आठवड्यापूर्वी 150 ते 160 असणाऱ्या कांद्याचा आजचा दर 100 रुपयापर्यंत आला आहे.

त्यामुळे कांदा खरेदीकडे पुन्हा ग्राहक सरसावले आहेत. कांदा आवक वाढल्याने हा दर 50 रुपयांवर खाली येण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

कांद्याच्या उतरलेल्या दरामुळे ग्राहक वर्गाला थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *