Sun. Jan 16th, 2022

स्मशानभूमीतील सरणावर झोपून रक्तदान

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीतील इस्लामपुरात स्मशानभूमीत लक्षवेधी रक्तदान शिबिर पाहायला मिळालं. स्मशानभूमीतील सरणावर झोपून रक्तदान करण्यात आलं.

 

लोकराज्य विद्या फाऊंडेशनच्यावतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी चक्क अध्यक्ष चंद्रशेखर तांदळेंनी रक्तदान केलं.

 

समाजातील गरजूंना याचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या अनोख्या रक्तदानाची इस्लामपुरात सध्या चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *