Thu. Mar 4th, 2021

कोरोनाच्या संकटादरम्यान कामगारांसाठी सानिया मिर्झाचा पुढाकार

कोरोना महामारीमुळे जगावर संकट कोसळलं आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनची घोषणा सरकारने केल्यामुळे रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत अनेक उद्योगपती, कलाकार, सेलिब्रिटी गरीबांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झादेखील या कामात पुढे आहे. आर्थिक संकटांशी सामना करणाऱ्या मजुरांना मदत करण्यासाठी सानिया मिर्झाने मदत करायचं ठरवलं आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट करत सानिया मिर्झाने २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात मजुरांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा काळ हा देशासाठी अत्यंत कठीण आहे. या काळात रोजंदारीवर काम करणारे कामगार भरडले जाणार आहेत. त्यांच्याकडे २१ दिवस काम नसल्यामुळे त्यांच्यापुढील आर्थिक समस्या बिकट झाली आहे. अशा लोकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं, असं आपल्या पोस्टमध्ये सानिया मिर्झाने म्हटलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग असल्याचं २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत २१ दिवसांची ताळेबंदी जाहीर केली. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे. तसंच हे संकट कामगारांवर मोठ्या प्रमाणावर आहे. अशावेळी सानिया मिर्झाने पुढाकार घेत या कामगारांसाठी मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *