‘जन औषधी केंद्रां’मध्ये सॅनिटरी नॅपकिन 1 रुपयात!

सरकारी ‘जन औषधी केंद्रां’मध्ये आजपासून सॅनिटरी नॅपकिन एक रुपयात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन अनुदानित किंमतीत उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. हे जैवविघटनशील नॅपकिन जन औषधी केंद्रांमध्ये अडीच रुपयांना एक या किमतीत मिळत होते, ते आता एक रुपये दराने मिळणार आहेत. त्यामुळे याआधी चार नॅपकिनचं 10 रुपयांना मिळणारं पाकिट आता चार रुपयांना मिळणार आहे.
‘जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स आता 1 रुपयांत उपलब्ध करत आहोत.
देशभरातील 5500 ‘जन औषधी केंद्रां’मध्ये ‘सुविधा’ या नावाने हे नॅपकिन्स उपलब्ध असतील, असे मांडवीय म्हणाले.
जन औषधी केंद्रांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करण्याची योजना मार्च 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती. मे 2018 पासून जन औषधी केंद्रांत ती राबवण्यात आली. गेल्या एक वर्षात सुमारे 2.2 कोटी नॅपकिनची विक्री करण्यात आली, असंही राज्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले.