पोलिसांसाठी सॅनिटायजेशन मोबाईल व्हॅन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र पोलिसांनाही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू पासून बचाव व्हावा यासाठी परभणी पोलिस दलाच्यावतीने सॅनिटायजेशन मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आलीये.
शहरात ठिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे, दररोज शेकडो वाहनांची तपासणी केली जात असतांना. नागरीकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पोलिसांसाठी सॅनिटेशन मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिलीये.
व्हॅनमध्ये सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्यात आलीये. त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या पोलीस कर्मचारी ही आता आपलं कर्तव्य भयमुक्त बजावणार आहे.