“…हा काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट”
Sanjay Nirupam Alleges Conspiracy Behind Campaign To Make Sharad Pawar Upa Chairman

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्र स्विकारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळलं. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
दिल्ली से मुंबई तक राहुल गांधी के खिलाफ जो अभियान चल रहा है,उसी का हिस्सा है शरद पवार को यूपीए का चेअरमैन बनाने का शिगूफा।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 11, 2020
उसी अभियान के तहत 23 हस्ताक्षर वाली चिट्ठी लिखी गई थी।
फिर राहुलजी के नेतृत्व में कनसिस्टेंसी की कमी ढूँढी गई है।
एक बड़ा प्लान है #कॉंग्रेस को ही मिटाने का।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे”.
“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.