Sun. Oct 17th, 2021

“वाचळवीर संजय राऊतांनी विठ्ठल नावाचं पावित्र्य घालवलं”

गेल्या काही दिवसांपासून उपमा देण्यावरुन राज्यातील राजकारण उफाळून निघालं आहे. वादग्रस्त पुस्तकाचा वाद शमतो न शमतो, यातच आता नव्या वादाला तोंड फुटलयं.

संजय राऊत यांनी शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिली. यामुळे या घटनेचं तुषार भोसले यांनी निषेध केला आहे. तुषार भोसले हे वारकरी सांप्रदायातील आचार्य आहेत.

तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. असे आवाहन तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

याबाबतचा एक व्हिडिओ भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत खात्यावरुन ट्विट करण्यात आला आहे.

या व्हिडिओतून तुषार भोसले यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले तुषार भोसले ?

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला महान असा वारसा लाभला आहे. श्री विठ्ठल केवळ वारकरी सांप्रदायाचे नाहीत तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.

राजकीय नेत्यांची खुषमस्करी करणाऱ्या संजय राऊत सारख्या वाचाळवीराने शरद पवारांना विठ्ठलाची उपमा दिली आहे.

वारकरी सांप्रदायाच्या वतीने आणि महाराष्ट्रातील आध्यातमिक जनतेच्या वतीने संजय राऊतांचा कडकडीत निषेध करतो आणि कृत्याची निंदा करतो.

संजय राऊत यांनी फक्त महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा अपमानच नाही केला.

तर आध्यत्मिक क्षेत्राचा द्वेष करणाऱ्या नास्तिक असणाऱ्या शरद पवारांना राऊतांनी विठ्ठलाची उपमा देऊन विठ्ठल नावाचं पावित्र्य घालवलं, असंही भोसले म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबात खुलासा करण्याचे आवाहनही भोसले यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

शिवसनेचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी खुलासा करण्याची मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि संजय राऊतांच मत, हेच शिवसेनेचं आणि मुख्यमंत्र्याचं मत आहे का, यावर मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त करावं. असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

संजय राऊतांचं असलेलं मत हेच शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांच असेल तर, उद्धव ठाकरे वारीमध्ये कॅमेरा घेऊन वारकऱ्यांचे फोटो काढून वारीच्या चित्रांच पुस्तक प्रकाशित करायची काय गरज होती.

त्यापेक्षा शरद पवारांच्या मागे कॅमेरा घेऊन फिरायचं होतं. तसेच वेगवेगळे छटा असलेले फोटो प्रकाशित करायचे होते. असंही भोसले म्हणाले.

.. तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही

जोपर्यंत उद्धव ठाकरे या प्रकरणाचा खुलासा करत नाही, तो पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला उद्धव ठाकरेंना पांडुरंगाची महापूजा करण्याचा नैतिक अधिकार नाही.

उद्धव ठाकरे शरद पवारांची आरती तर करतातच. त्यांनी आषाढी एकादशीला शरद पवारांच अभिषेक करुन त्यांची महापूजाही करावी, असंही तुषार भोसले म्हणाले.

महाराष्ट्राची जनता आणि आध्यात्मिक क्षेत्र हे सहन करणार नाही. संजय राऊतांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. तसेच वारकरी सांप्रदायाची आणि आध्यात्मिक क्षेत्राची माफी मागावी.

अन्यथा संप्रदाय आणि अध्यात्म क्षेत्र त्यांची ताकद दाखवून देईल, असा इशारा दिला आहे.

नक्की प्रकरण काय ?

महाराष्ट्रात आम्ही दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल म्हणजे शरद पवार तर दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे.

शरद पवारांनी आमच्यासारख्या सामन्य माणसाला बोट धरुन मंत्रालय दाखवलं. असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा दिली.

ठाण्यातील कळव्यामधईल खारेगावात ठाणे महोत्सवात संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं होतं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *