Tue. Mar 31st, 2020

महाराष्ट्रातील ‘ते’ नेते अजून गप्प का?, संजय राऊत यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याचा वाद संपतो ने संपतो तोच ‘तान्हाजी-  द अनसंग वॉरियर’ (Tanhaji-The Unsung Warrior) मधील दृश्याचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा लावल्यामुळे शिवप्रेमी पुन्हा संतापले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर कडाडून टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचारात केला जातोय.

छत्रपतींवर बोलण्याचा आपल्यालाच अधिकार आहे, असं वाटणारे महाराष्ट्रातील नेते यावर अजून गप्प का बसले आहेत?  

चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही लोकांनी हंगामा केला होता. सातारा, सांगली बंद केलं होतं. जीव गेला तरी शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, ते आमचे दैवत आहे, असं जे नेते म्हणत होते, ते का आता शांत आहेत?

शिवछत्रपती आणि सुभेदार तानाजी यांच्या चेहऱ्यावर राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचारात वापरले जात आहेत. याचे फोटो मी त्या नेत्याना पाठवले आहेत.

त्यांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *