Tue. May 11th, 2021

इंदिरा गांधी-करीम लाला भेटीच्या वक्तव्याबद्दल राऊतांची शरणागती, फडणवीसांकडून प्रश्नांची सरबत्ती

काँग्रेस नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटल्या होत्या, या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर गदारोळ माजला. संजय निरूपम, मिलिंद देवरा यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतले. काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना अडचणीत येण्याची चिन्हं दिसू लागल्यावर संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अवघ्या 2 तासांत राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलंय. ‘कुणी दुखावलं असल्यास ते वक्तव्य मागे घेतो’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी झालेल्या चर्चेत मोठा गौप्यस्फोट केला होता. शिकागोपेक्षाही मुंबईचं अंडरवर्ल्ड मोठं होतं. आपण स्वतः दाऊद इब्राहिमला अनेकदा भोटलो, बोललो आणि दमही दिला होता, असं राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच इंदिरा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून उफाळलेल्या वादानंतर राऊत यांनी वक्तव्य मागे घेतलंय. मात्र विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त सवाल केले आहेत.

इंदिरा गांधीजी मुंबईत का येत होत्या?

अंडरवर्ल्डच्या माध्यमातून काँग्रेस निवडणूक जिंकत होती का?

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फंडिंग करीत होती का?

काँग्रेस पार्टीला निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिची गरज पडत होती का?

छोटा शकील, दाऊद इब्राहिम मुंबईचे सीपी हे ठरवत होते का? की, मंत्रालयमध्ये कोण बसणार आहे, तसंच क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सची सुरूवात यांच्या कार्यकाळात झाली का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमती सोनियाजी, राहुलजी, प्रियंकाजी यांना दयावे लागतील

इंदिराजी सारख्या मोठ्या नेत्यांवर हे सर्व आरोप होत आहेत, परंतु काँग्रेस शांत का ?

मुंबईवर हल्ला करणारे जे होते त्यांना काँग्रेसनं साथ दिली आहे का?

या सर्वं प्रश्नांची उत्तरं काँग्रेस का देत नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *