Fri. Sep 25th, 2020

महाराजांच्या वंशजांनी ताबडतोब राजीनामे द्यायला हवे- संजय राऊत

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजप नेत्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून वादाचं मोहोळ उठलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत हे पुस्तक भाजपने मागे घ्यावं अशी मागणी केली आहे. तसंच छत्रपतींच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘छत्रपतींच्या वंशजांनी राजीनामे द्यायला हवे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना मान्य आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय.  

महाराष्ट्रातल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोदींशी तुलनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी.  

महाराजांचे सर्व वंशज सध्या भाजपा (BJP) मध्ये आहेत.

महाराजांच्या वंशजांबद्दल आम्हाला आदर आहे. पण याचा अर्थ त्यांनी भूमिका घेऊ नये, असा आहे का? असा सवाल राऊत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांशी अशा प्रकारे तुलना केल्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे, असं रोखटोक मत संजय राऊत यांनी यावेळी मांडलं.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींची चूक नाही

घडल्या प्रकारात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मात्र काही चूक नसल्याचं म्हटलं.

नरेंद्र मोदी महान व्यक्ती आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करणं अयोग्य आहे.

या पुस्तकाबद्दल त्यांना स्वतःलाही माहिती नसेल. पंतप्रधानांच्या परोक्ष ही चमचेगिरी चालते.

मात्र हे पुस्तक मागे घेतलं पाहिजे. तसंच भाजपाने आपला या पुस्तकाशी संबंध नसल्याचं जाहीर करावं.

महाराष्ट्रातील भाजप नेते या प्रकाराबद्दल अवाक्षरही काढत नाहीत. अशा लोकांना महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा अधिकार नाही. तसंच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचाही अधिकार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

पुस्तकाच्या लेखकाची पोलखोल

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांचीदेखील संजय राऊत यांनी पोलखोल केली.

जय भगवान गोयल याने 15 वर्षापूर्वी दिल्लीत महाराष्ट्र सदनावर त्याने हल्ला केला होता.

महाराष्ट्रा विरोधात गरळ ओकली होती.

त्यावेळी त्यांना आव्हान देणारा मी पहिला खासदार होतो.

मी त्यांना पळवून लावलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *