Wed. Dec 1st, 2021

दिल्लीनं पुण्याला लोळवलं, संजू सॅमसनची सेंच्युरी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे  

 

दिल्ली डेअरडेव्हिल्सनं पुण्याचा तब्बल ८७ रन्सनी धुव्वा उडवला आहे. २०६ रन्सचा पाठलाग करताना पुण्याचा डाव फक्त १०८ रन्सवर आटोपला. पुण्याला या मॅचमध्ये १०० बॉल्सही खेळता आले नाहीत. १६.१ ओव्हरमध्येच पुण्याला पराभवाचा सामना करावा लागला.

 

 

दिल्लीचा कॅप्टन झहीर खाननं आणि अमित मिश्रानं या मॅचमध्ये सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर कमिन्सला २ आणि नदीम-मॉरिसला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

घरच्या मैदानात खेळताना पुण्यानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला पण संजू सॅमसनच्या सेंच्युरीमुळे दिल्लीला २०० रन्सचा टप्पा गाठता आला. सॅमसननं ६३ बॉल्समध्ये १०२ रन्सची खेळी केली तर क्रिस मॉरिसनं फक्त ९ बॉलमध्ये ३८ रन्स केल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *