Thu. Jul 16th, 2020

संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान…

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

आळंदीमध्ये सध्या टाळ मृदंग आणि हरिमनामाचा नाद घूमत आहे. आज शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान पालखी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सकाळपासूनच शासकीय पूजा अर्चना करण्‍यात आली असून दुपारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले. संत ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम आज मौकींच्या आजोळ घरी म्हणजेचं गांधी वाडा येथे असून दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान पुण्याकडे होते.

तुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर…

पुण्यनगरी देहूतून संततुकोबांच्या पालखीचं प्रस्थान…

आता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *