Tue. Oct 15th, 2019

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत 5 महिन्यांत कोट्यावधींची वाढ !

विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा आज पुण्यात होणार आहे. ही सभा आज संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या सरस्वती मंदिर मैदानात होणार आहे. सातारा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आणि माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. यामध्ये शपथपत्रातून उदयनराजे भोसले यांची संपत्ती समोर आली आहे. या पाच महन्यांमध्ये उदयनराजे भोसले याच्या संपत्तीत दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

5 महिन्यांत दीड कोटींची वाढ !

उदयनराजेंच्या संपत्तीत 5 महिन्यात कोट्यवधींची वाढ झाली आहे.

त्यांच्या संपतीत तब्बल दीड कोटींनी वाढ झाल्याचे समजते आहे.

या मध्ये जवळजवळ 40 किलोच्या दागदागिन्यांचा समावेश आहे.

2014 ला उदयनराजेंची जंगम मालमत्ता 13 कोटी 81 लाख एवढी होती.

यावर्षी सध्याला जंगम मालमत्ता 14 कोटी 44 लाखांच्या पुढे आहे.

सोने-हिऱ्याचे दागिने,कंठहार,शिरटोपही या मालमत्तेत असल्याची माहिती आहे.

उदयनराजेंची स्थावर मालमत्ता 185 कोटींची आहे.

यामध्ये 4 अलिशान चारचाकी, 1 कोटी 82 लाखांचं वाहनकर्जाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *