Mon. Mar 8th, 2021

आनंदाची बातमी, आता पोटहिस्स्याचा स्वतंत्र 7/12 मिळणार

पोटहिस्स्याचा सातबारा मिळणार

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर: शेतजमिनीच्या वादातून होणारी भांडणे आता मिटणार आहेत. पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा अभिलेख हिस्स्याप्रमाणे वेगळे केले जाणार आहेत. त्याप्रमाणे स्वतंत्र नकाशेही तयार केले जाणार आहेत. या पद्धतीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने सभा घेऊन या मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. पोटहिस्स्याचा स्वतंत्र सातबारा अभिलेख तयार करण्यासाठी भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारसीनुसार भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी अभिलेख पोटहिस्सा मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *