Sat. Jul 4th, 2020

साताऱ्यात पार पडला अनोखा सत्यशोधक विवाहसोहळा

साता-याची ओळख हि नेहमीच क्रांतीकारक म्हणुन होते, स्वातंत्र्यकाळात क्रांतीची पहिली मशाल सातारा इथेच पेटली. याच साता-याला सामाजिकतेची मोठी परंपरा लाभली आहे, गेल्या काही वर्षापासुन लग्न समारंभात लाखो रुपयांची उधळपट्टी होताना दिसत आहे.

मात्र सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर इथे अत्यंत आगळया वेगळया पध्दतीचा सत्यशोधक विवाह सोहळा अनुभवायला मिळाला आहे.

रहिमतपुर पिंपरी येथील शंकर कणसे यांच्या उच्च शिक्षित मुलगा किरण याच्यां लग्नात ही अनोखी पद्धत पहायला मिळाली.
सर्व वऱ्हाडी मंडळींच स्वागत पुस्तक भेट देऊन करण्यात आलं तसेच वधुची ओटी भरणी देखील पुस्तकानेच करण्यात आली.

एवढेचं नव्हे तर मंगलाष्टका देखील महात्मा फुले यांचे विचार वाचुन करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *