Wed. Dec 1st, 2021

अकोल्यात आढळलं स्त्री जातीचं अर्भक

अकोला जिल्हयात अकोट तालुक्यातील ग्राम केळेवेळी येथे मृत अर्भक आढळून आले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अर्भक 6 महिन्यांचे आहे असंही सांगण्यात येत आहे.एका सांडपाण्याच्या नाल्यामध्ये हे मृत अर्भक आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच दहिहंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्त्री भ्रूण हत्येविषयी वारंवार जनजागृती केली जात आहे. तरीही असे प्रकार घडत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अकोला जिल्हयात मृत अर्भक आढळून आले आहे.

हे अर्भक स्त्री जातीचे असून 6 महिन्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका सांडपाण्याच्या नाल्यामध्ये हे मृत अर्भक आढळून आले आहे.

अकोला जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत असतात.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान हे अर्भक त्याठिकाणी कसे आले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच दहिहंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *