Wed. Aug 4th, 2021

‘नाम फाउंडेशन’मध्ये करोडोंचा भ्रष्टाचार- तनुश्री दत्ता

‘नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे दुसरा आसाराम बापू (Asaram Bapu) आहे’ अशा शब्दांत तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरवर टीका केली आहे. तनुश्री दत्ता हिने काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून भारतात #MeToo चळवळ सुरू झाली होती.

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरने सिनेमाच्या शुटिंगदरम्यान आपलं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात तिने पोलिसांत गुन्हादेखील दाखल केला. मात्र नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिने पत्रकार परिषदेत केला.

याचबरोबर नाना पाटेकर यांच्या गुंडांनी आपल्या सेटवर गोंधळ घातल्याचा आरोप तिने केला.

कोरिओग्राफर गणेश आचार्यने माझं करिअर देखील उद्ध्वस्त केलं असा आरोपही तिने केला.

नाम फाउंडेशनवरही प्रश्नचिन्ह

तनुश्रीने नाना पाटेकरच्या वैयक्तिक गोष्टींप्रमाणेच त्यांच्या ‘नाम फाऊंडेशन’वरही गंभीर आरोप केले.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या.

मात्र त्या पैशांचा हिशेब कुठे आहे?

नाना वर्षातून एकदा गरीब बिधवांना साड्या वाटून फक्त फोटो काढतो.

कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरं देण्याच्या घोषणेचं काय झालं? असा सवालही तिने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *