भारतीय विद्यार्थ्यांनी शोधले १८ नवीन लघुग्रह

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासानुसार एसटीईएम अँड स्पेस या संस्थेने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्प आयोजित केला होता. या संस्थेने जागतिक विज्ञान कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय विद्यार्थ्यांनी १८ नवीन लघुग्रह शोधल्याची माहिती नुकतीच दिली आहे. एसटीईएम अँड स्पेस या संस्थेचे सह-संस्थापक आणि शैक्षणिक प्रमुख, मिला मित्रा यांनी पीटीएआयला सांगितले की, गेल्या दोन वर्षात, संपूर्ण भारतातून १५० विद्यार्थ्यांनी लघुग्रह शोधण्यासाठी दोन महिन्यांच्या या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. या प्रकल्पात भारत आणि जगभरातील विद्यार्थ्यांनी आयएएससीद्वारे प्रदान केलेल्या उच्च गुणवत्तेच्या खगोलशास्त्रीय माहितीचे विश्लेषण केले. तसेच लहान मुलांसाठी लघुग्रह आणि नियर अर्थ ऑब्जेक्ट्स (एनईओ) शोधण्यासाठी हा एक ऑनलाइन वैज्ञानिक प्रकल्प आहे.
मित्रा आणि तिच्या टीमच्या म्हणण्यानुसार लघुग्रहांचा नियमितपणे मागोवा घेण्यात यावा यासाठी नासाने आयएसएसीसारखे कार्यक्रम नियमितपणे सुरू केले आहेत. शिवाय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अधिक लघुग्रहांचा शोध आणि त्याचा मागोवा घेता यावा यासाठी हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले केले आहे. एनईओ म्हणजे मंगळ आणि बृहस्पति यांच्या दरम्यान असलेल्या कक्षामध्ये अनेक लघुग्रह आढळून येणाऱ्या खडकाळ वस्तूमुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो आणि हे लघुग्रह कक्षापासून विचलित होऊ शकतात ज्यांमुळे पृथ्वीला एक प्रकारचे आव्हान निर्माण होवू शकते.