पुण्यातील शाळा बंदच राहणार

राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील शाळा बंदच राहणार असल्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकित पुण्यातील शाळा आठवडाभर शाळा बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील २४ तासांमध्ये पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीनेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर एक आठवड्यानंतर पुन्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये दहावी, बारावीचे वर्ग भरणार
औरंगाबाद शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे,त्यांनाच वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोना लस घेणे बंधनकारक झाले आहे. कोरोना लस घेतली नसेल तर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही.
I gotta say this internet web page is definitely unique, hold submitting fantastic info.