Tue. Jul 14th, 2020

स्क्रब टायफसपासून सावधान! नागपूरमध्ये आणखी 2 बळी

बुलडाण्यामध्ये जीवघेण्या स्क्रब टायफसचा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याआधी विदर्भ आणि मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळून आले

आता बुलडाण्यामध्येही हा रोग फाफावताना दिसतोय. बारीक कीटकाच्या चावल्यामुळे या रोगाची लागण होत असून वेळीच उपचार न केल्यास यात जीव जाण्याचा धोका सुद्धा असतो.

दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील या रुग्णावर वेळीच उपचार केले त्यामुळे त्या रुग्णाचा जीव वाचलाय, तर दुसरकीडे नागपूरमध्ये स्क्रब टायफसचे अजून 2 बळी गेले आहेत.

नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना या दोघांचा मृत्यू झालाय.. या आजाराचे रुग्ण 37 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 जणांची गंभीर आहे,त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत..

स्क्रब टायफस म्हणजे नक्की काय?

 • स्क्रब टायफस हा किटाणू उंदरामध्ये आढळतो
 • माइट रेक्टेशिया या जीवाणू स्क्रब डायफसचा वाहक
 • हे जीवाणू शेत,गवतात राहणाऱ्या उंदरांमध्ये आढळतात
 • हा जंतू त्वचेच्यामार्गानं शरीरात प्रवेश करतो

स्क्रब टायफसची लक्षणं –

 • 104 -105 पर्यंत ताप भरतो
 • अंगावर लाल पूरळ उठतात
 • लागण झाल्याच्या 5 ते 12 दिवसानंतर ही लक्षणं दिसतात
 • डोकेदुखी, अंग जड वाटणं, भूक न लागणे

स्क्रब टायफसची लागण कुणाला होते?

 • कमी वयाच्या लोकांना प्राणघातक नाही
 • 60 वर्षांवरील लोकांसाठी प्राणघातक

स्क्रब टायफसची लागण कशी टाळाल?

 • घर आणि शेताच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
 • शरीर स्वच्छ ठेवावे
 • शेतात काम करताना किंवा झाडाझुडपातून चालताना अंग कपड्याने पूर्णपणे झाकावे
 • घराच्या बागेत आणि शेतात वेळोवेळी किटकनाशकांची फवारणी करा

काय आहे हा जीवघेणा स्क्रब टायफस?

नागपूरात स्क्रब टायफस आजाराचं संकट, 5 जणांचा मृत्यू

स्क्रब टायफस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *