शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक
जय महाराष्ट्र न्यूज, मराठवाडा
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आजपासून शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधाणार आहेत.
या उपक्रमात शिवसेना आमदार आणि नगरसेवकही सहभागी होणार आहेत. 6 मे पासून शेतकरी-ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.