अर्थसंकल्पामुळे Share market उसळला, 400 अंशांहून अधिक वाढ

अंतरिम अर्थसंकल्पातून सरकारने मध्यमवर्गाला तसंच उद्योजकांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचे पडसाद share market वरही आज उमटले. BSE चा निर्देशांक 500 अंशांनी आणि NIFTY 147 अंशांनी वाढला होता. मात्र दुपारनंतर निर्देशांक 450 अंशांच्याही खाली आला.
पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे share marketमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
मुंबई share marketच्या निर्देशांकामध्ये काही मिनिटांत 400 अंशांहून अधिक वाढ झाली.
NIFTYही 150 अंशांच्या दरम्यान वधारला होता.
Share Market निर्देशांक
सकाळी BSE चा निर्देशांक 82.41 अंशांनी वधारला
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 1 वाजेपर्यंत हा निर्देशांक 500 अंशांपर्यंत वाढला होता.
मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत निर्देशांक खालावला.
त्यानंतर निर्देशांकात 427.98 अंशांची वाढ दिसली.
यावेळी निर्देशांक 36,684.67 अंशांवर होता.
NIFTYचा निर्देशांक 128.90 अंशांनी वाढला.
अर्थसंकल्पामुळे निर्देशंकातील 26 कंपन्यांचे Shares चे भाव होते.
तर 6 कंपन्यांच्या Shares मध्ये घसरण झाली होती.
एकीकडे अर्थसंकल्पामुळे Share market मध्ये उत्साह वाढला होता, तर दुसरीकडे सरकारच्या मोठ्या घोषणांमुळे अनिश्चितताही झळकली.