Wed. Mar 3rd, 2021

‘सीरम’प्रमुख अदर पूनावाला‘एशियन ऑफ दी इयर’ घोषित

अदर पूनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ यादाव्दारे सन्मानित करण्यात येणार…

सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांना ‘एशियन ऑफ दी इयर’ यादाव्दारे सन्मानित करण्यात येणार आहे. पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून त्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे. या मानकऱ्यांमध्ये उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’ असा करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाप्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या दी स्ट्रेट्स टाइम्स’वृत्तपत्राने केली आहे. या यादीमध्ये चीनचे संशोधक झांग योंगझान यांचाही समावेश आहे शिवाय या मानकऱ्यांमध्ये चीनचे मेजर जनरल चेन वेई, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग आणि जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा यांचा देखील समावेश आहे. या सर्वांनी कोरोना लसनिर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली आहे. त्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *