Tue. Oct 27th, 2020

राजूरा वसतीगृहात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार ,5 अटक

चंद्रपूर मधील राजूरा येथे एका खाजगी वसतीगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये वैधकीय चाचणीत 7 मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 18 मुलींकडून पोलीसांनी यांसदर्भात माहिती घेतली आहे.याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. या घटनेनंतर वसतीगृहातील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष समिती नेमून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजूरा मध्ये एका खाजगी वसतीगृहात मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात दोन महिला कर्मचा-यांसहीत आता पर्यंत 4 जणांना अटक करण्यात आले होते.

या प्रकारणाचा तपास सुरु असून वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक व्यकंटस्वामी जंगम याला पोलिसांनी अटक केली आहे.

यामध्ये नागपुर खंडपीठाने अतिरिक्त सत्र न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली समीती गठीत केली आहे.

या विशेष समीतीमार्फत या प्रकारणाचा तपास केला जात आहे.

वैधकीय चाचणीत 7 मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

18 मुलींकडून आतापर्यंतपोलीसांनी यांसदर्भात माहिती घेतली आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वसतीगृह तसेच शाळा प्रशासनाचा ताबा घेतला आहे.

या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *