Sat. Jan 22nd, 2022

अभिनेता शाहीर शेख लवकच बनणार पिता

‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता शाहीर शेख लवकच पिता बनणार असल्याचं कळत आहे. त्याची पत्नी रूचिका कपूर प्रेग्नंट ही आहे. रूचिका कपूर सध्या तीन महिन्यांची गर्भवती असून या दोघांच्या आयुष्यातील हे नवीन वळण आहे. या बातमीमुळे दोघेही फार उत्साहित आहेत. शिवाय शाहीर आणि रूचिकाने दिलेली ही गोड बातमी ऐकून त्याचे चाहते देखील खूश झाले आहेत. मात्र शाहीरला ही गोड बातमी कुणाला सांगायची इच्छा नव्हती. शाहीर शेख हा त्याच्या पर्सन लाइफ बद्दल बोलताना कधीच दिसत नाही आणि त्याला ते आवडत देखील नाही. त्याच्या घरी लवकरच एका लहान पाहूण्याची एन्ट्री होणार आहे. ही गोड बातमी त्याला कुणालाच सांगायची इच्छा नाही, असं शाहीर शेखने एका माध्यमाशी बोलताना स्पष्ट केलंय. यामागचं कारण असं आहे. सध्या कोरोना महामारीमुळे देशात जी संकटं सुरू आहेत, अशा परिस्थितीत त्याला ही गोड बातमी देणं योग्य वाटत नाही, असं शाहीर शेख म्हणाला. तसंच रूचिका सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे. पुढे शाहीरने सांगितलं की तो, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या टप्प्यासाठीचे एक एक क्षण अनुभवत आहेत, आणि तो फार उत्साहित आहे. असं शाहीरने सांगितलं. शाहीर शेख आणि रूचिका कपूर यांचं लग्न गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालं होतं. या दोघांची भेट ही ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान झाली होती. एका कॉमन फ्रेंडमुळे त्यांची ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं. सुरवातील या दोघांची मैत्री झाली त्यानंतर त्यांनी एकामेंकाना डेट केलं काही दिवसानंतर त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. शाहीरने रूचिका बद्दल सांगताना म्हटलं, “रूचिका ही फार प्रामाणिक आहे.आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी आहोत, ही आमच्या नात्यातली एक मजबूत बाजू आहे. एक अभिनेता या नात्याने मला कॅमेरासमोर रोज नव नव्या भूमिका निभवाव्या लागतात. पण मला आता तिच्या रूपातून एक पार्टनर भेटलीय जिच्या समोर मी रिअल राहू शकतो. मी खूप नशीबवान आहे, की मला रूचिकासारखी पार्टनर भेटली आहे. मी कायम तिच्यासोबत राहण्यासाठी तयार आहे.” रूचिका कपूर बद्दल सांगायचं झालं तर ती एकता कपूर फिम्सची हेड आहे. खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर शाहीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्यांच्यातील नात्याबाबत जाहीर केलं होतं. जवळपास ते दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. आणि आता रुचिका ही लवकरच आई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *