Tollywood चा ‘अर्जुन रेड्डी’, Bollywood चा ‘कबीर सिंह’!

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरच्या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. ‘कबीर सिंह’ या सिनेमामध्ये शाहिद सोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. हा सिनेमा साऊथच्या सुपरहिट ठरलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमाचा रिमेक असणार आहे. या सिनेमाच्या टीझर शेअर करताना त्याने ‘मी असाच बंडखोर नाही… हा मी आहे… ‘असे लिहीले आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. येत्या जून मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कसा आहे ‘कबीर सिंह?
बॉलिवूडमध्ये रिमेक होणाऱ्या सिनेमांना खूपच डिमांड आहे.
यांच्या प्रेक्षकवर्गामध्येही वाढ होतेय.
दुसऱ्या भाषेतील एखाद्या चांगल्या स्क्रिप्टचे अनेक रिमेक हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये आले आहेत.
त्यातले काही सिनेमे अव्वल ठरले.
असाच आणखीन एक सुपरहिट सिनेमा असलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु सिनेमाचा ‘कबीर सिंह’ हा सिनेमा येणार आहे.
यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भुमिकेमध्ये आहेत.
याचा टीझर नुकताच रिलीज झालाय.
याच टीझर मध्ये शाहिद कपूर ची अनोखी झलक पाहायला मिळतेय.
I’m not a rebel without a cause. This is ME ! #kabirsingh https://t.co/IFjTuIJoWG
— Shahid Kapoor (@shahidkapoor) April 8, 2019
हा सिनेमा 29 जून 2019 ला प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहेत,
याच्याच तेलुगु सिनेमाचे दिग्दर्शनही संदीप रेड्डी वंगा यांनीच केले होते.