गौरीने शेअर केले शाहरुखचे हे सिक्रेट

‘मोस्ट स्टाईलिश कपल’ साठी नुकतेच शाहरूख खान आणि गौरी खान यांना सन्मानित करण्यात आलं आहे. बॉलिवूडच्या या मोस्ट लविंग कपलने यावेळेस वैयक्तिक किस्से सांगत ते दोघे कसे मेड फॉर इच अदर आहेत, हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. स्टाईलशी काहीही देणं घेणं नसताना हा अवॉर्ड मिळतोय असं गौरीने सांगितलं यातून दोघांमध्येही खुमासदार संवादाने मोहौल रंगला होता. बॉलिवूडमध्ये ब-याच मॅरिड कपल्सने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना, दीपिका पादुकोन-रणवीर सिंग, काजोल-अजय देवगण अशा यशस्वी जोडप्यांना मागे टाकत शाहरूख खान आणि गौरी खान या दोघांना ‘मोस्ट स्टाईलिश कपल’ म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.
गौरीने शेअर केला सिक्रेट किस्सा
शाहरूख खान आणि गौरी खान या दोघांना ‘मोस्ट स्टाईलिश कपल’ म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे.
यावेळी गौरीने शाहरूखचं एक सिक्रेट शेअर केल्यावर शाहरूख अगदी लाजला होता.
तिच्या मते, स्टाईलशी काहीही देणं घेणं नसणा-या व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे.
शाहरूख हा आमच्या दोघांमध्ये ‘तयार होण्यासाठी’ जास्त वेळ घेतो.
साधारण नेहमी तयार व्हायला मला २० मिनिटं लागतात तिथे शाहरूख २ ते ३ तास लागतात.
या अवॉर्ड प्रोग्रामसाठी मला साधारण २ ते ३ तास लागले तर शाहरूखला तब्बल ६ तास लागले.
यावर शाहरूख अगदीच लाजला आणि ‘तू आज सुंदर दिसतेयस’ म्हणत विषय बदलून टाकला.
तिने याचा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
एक यशस्वी अभिनेता असतानाही शाहरूख एक टिपिकल नवरा असल्याचं यावरून लक्षात येतं.