मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यपदी शरद पवार

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यपदी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड झाली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शरद पवारांनी २९ मत मिळवत बाजी मारली आहे. तर धनंजय शिंदे यांना अवघे २ मत मिळाले आहेत.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी ३१ नागरिकांनी मतदान केले. त्यापैकी २९ मत मिळवून शरद पवारांनी ग्रंथसंग्रहायलाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तब्बल तीस वर्षांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलाची निवडणूक पार पडली. मात्र निवडणूकीत उमेदवारांनाच मतदान करण्याचा अधिकार न दिल्याने निवडणूक प्रक्रिया वादात अडकली होती. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेचे सहा हजार मतदार डावलून अवघ्या ३१ नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळाला. याविरोधात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली.