Wed. Aug 4th, 2021

अजित पवार राजकारण सोडून शेती करण्याच्या विचारात, मुलालाही सल्ला – शरद पवार

NCP Leader Sharad pawar

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र शरद पवारांची पोलीस आयुक्तांनी भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांसमोर जाहीर केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.

त्यातच अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. मुदतीपुर्व राजीनामा देण्याचं कारण गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात कल्पना नसल्याचे बोललं जात आहे. यावर शरद पवार यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल मला कुठलीही कल्पना नव्हती.

राजीनामा देण्यापुर्वी अजित पवार कुटुंबियांशी बोलले. पवार कुटुंबात कुठलेही मतभेद नाही.

सहकारी बँकेत सभासद, संचालक नसतांनाही माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ होते.

मुलाशी बोलतांना अजित पवारांनी राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. राजकारणाची पातळी घसरली आहे. शेती करा असही ते म्हणाले

कुठलीही गोष्ट मनाला पटली नाही तर तडकाफडकी निर्णय घेण्याचा अजित पवारांचा स्वभाव आहे. लवकरचं अजित पवारांशी संपर्क साधणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *