Fri. Mar 5th, 2021

लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – शरद पवार

देशासह राज्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. याच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेते जनतेसोबत संवाद साधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे संबोधित केलं.

या फेसबुक लाईव्हमधून शरद पवारांनी फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. तसेच अनेक मुद्द्यांवर शरद पवार यांनी मत देखील मांडलं.

काय म्हणाले शरद पवार ?

दिल्लीत मर्कजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजारो लोक जमले होते. राज्यातूनही अनेकजण तिथे गेले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर येथील लोक इतरत्र गेले. यामधील काहींना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येउ शकत नाही.

आता करोनाचा आजार वाढतोय. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. हे असे प्रकार घडता कामा नये, याबाबतची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता, असं शरद पवार म्हणाले.

लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही – शरद पवार

राज्यात लष्कराला पाचारणाची गरज नाही. लष्कर परकीयांविरुद्ध बोलवलं जातं, स्वःकियांविरुद्ध नाही. त्यामुळे लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका. असं आवाहन शरद पवार यांनी केलं. तसेच दोन आठवडे धीर धरण्याचं आवाहनदेखील पवारांनी केलं आहे.

लॉकडाऊनंतर शरद पवार राज्यातील जनतेशी सातत्याने फेसबुकद्वारे संवाद साधत आहे. लॉकडाऊननंतर आजचं शरद पवार यांचं तिसरं फेसबुक लाईव्ह होतं.

दरम्यान राज्यातील कोरोनाचा आकडा हा 300 पार गेला आहे. दररोज वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *