Thu. Nov 26th, 2020

‘मला कुणाच्या परवानगीची गरज नाही’, शरद पवार यांचं वारकरी परिषदेला प्रत्युत्तर

‘मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं. शरद पवार नास्तिक असल्यामुळे त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नये, असं फर्मान राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलं आहे. त्यावर शरद पवार हे काय उत्तर देतात, याची सर्वांना उत्सुकता होती. आळंदी येथील जोग महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पवार यांनी उत्तर देत आपल्याला कुणाच्याही परवानगीची गरज नसल्याचं म्हटलं.

काय म्हणाले शरद पवार?

विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला यायचं असतं, तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं. यासाठी कोणाच्याही परवानगीची गरजच नाही. मी पंढरपूरला नेहमी येत असतो. पण मी पहाटे लवकर जाऊन दर्शन घेतो. राजकारणी म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रसिद्धी केलीच पाहिजे, असं नव्हे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

जे लोक अशा पद्धतीने परवानगी नाकरतात, त्यांना वारकरी संप्रदाय समजलाच नाही. सच्चा वारकरी कधी अशी भूमिका घेणार नाही. असंही पवार म्हणाले. ‘अशा लहानसहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपण आपला मार्ग सोडायचा नसतो. मी याच बांधिलकीतून येथे आलोय.‘ असं पवार यांनी बाषणात स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *