Fri. Mar 5th, 2021

युपीएच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींच्या जागी शरद पवार?

SHARAD PAWAR REPLACE SONIYA GANDHI AS A UPA CHAIRPERSON

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली: राज्यात भाजपाच्या तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापनेची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खेळली. त्यानंतर देशात कृषी विधेयकाच्या विरोधात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहेत. माजी कृषी मंत्री असलेले शरद पवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली.


शरद पवार आता यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय. युपीएमध्ये आधीच नेतृत्वाचा अभाव होता. युपीएला एका सशक्त नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे ते आता विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांत काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती. तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी याआधी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं अध्यक्षपदही स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती सुद्धा सुत्रांकडून सांगण्यात आली. त्यामुळे आता शरद पवार युपीएचं अध्यक्षपद भूषवणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *