Mon. Oct 26th, 2020

व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीवर शेअर करता येणार

एकाचवेळी व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करता येणार आहे.

Instagramने फेसबुकवर स्टोरी शेअर करण्याचा पर्याय पहिल्यापासूनच दिला गेला आहे. मात्र आता Whatsapp मध्येही नविन फिचर आले आहे. Whatsapp युजर्सना थेट Whatsapp Status फेसबुक स्टोरीमध्ये शेअर करता येणार आहे. आता Whatsapp आणि फेसबुक युजर्सना याचा फायदा होईल. एकाचवेळी Whatsapp, Facebook आणि Instagram वर Story शेअर करता येणार आहे.

एकाच वेळी होणार Insta, FB आणि Whatsapp वर स्टोरी शेअर !

जून 2019 मध्ये काही युजर्सला या फीचर्सचा बीटा व्हर्जनचा access दिला होता.

आता याचा स्टेबल व्हर्जन सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं गेलंय.

ओरिजनल Whatsapp status डिलीट केल्यानंतरही आपल्याला ती स्टोरी फेसबुकवर दिसेल.

Story share केल्यानंतर 24 तासासाठी visible राहणार आहे.

फेसबुकवर शेअर केलेलं स्टेटस screenshot प्रमाणे दिसेल.

याचबरोबर Whatsapp Status मध्ये शेअर केलेली लिंक फेसबुक स्टोरीमध्ये गेल्यावर क्लिक होऊ शकणार नाही.

अशा प्रकारे शेअर करता येणार

माय स्टेटसमध्ये जाऊन जे स्टेटस आपल्याला फेसबुकवर शेअर करायचे आहे, त्याच्या बाजूला असलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचे.

त्यानंतर तिकडे Share to Facebook हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट प्रायव्हेसी सेटिंगसह फेसबुक प्रोफाईल फोटो दिसेल.

प्रायव्हेसी सिलेक्ट केल्यानंतर शेअर नाऊवर क्लिक करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *