शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा
अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर शीतल आमटेनी आत्महत्येसाठी केला…

शीतल यांनी अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर हा आत्महत्यासाठी केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. शीतल आमटे यांनी जे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली ते विष अत्यंत घातक आहे. शिवाय अधिक माहितीनुसार, डॉ. शीतल यांचे कुटुंबीय, नोकर, आणि निकटवर्ती यांची देखील चौकशी पुर्ण झाली आहे.
डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने मुंबईमध्ये IT तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. यातील काहींमध्ये सॉफ्टवेअर लॉक असल्याचंही सांगण्यात येत आहे. पोस्टमोर्टमच्या अहवालानुसार स्पष्ट होत आहे की इंजेक्शनद्वारे विष घेण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही पोस्टमोर्टम अहवाल जाहीर केला नाही.
डॉ. शीतल या आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यापुर्वी आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. शीतल यांनी कौटुंबिक वादामुळे तर आत्महत्या केली नाही ना असे अनेक प्रश्न पडतांना दिसत आहे. याप्रकरणी पोलिसाची चौकशी सुरू आहे.