मार्गशीर्ष महिना, रविवार आणि एकादशीमुळे भाविकांच्या गर्दीने फुलली संतनगरी

बुलडाणा : मार्गशीर्ष महिना, सुट्टीचा रविवार आणि एकादशी असा योग्य आल्याने आज संतनगरी भाविकांनी दुमदुमून गेली. येथील संत गजानन महाराजाची विदर्भातील पंढरी म्हणून ओळख आहे.
महाराजांचे दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आपली इच्छा गजानन महाराजांकडे प्रकट करतात.
गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात. असाच योग आज आल्याने संत नगरी सकाळपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.
प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शेगावात गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकण्यासाठी भाविक येतात. यामध्ये आज मार्गशीष महीना, रविवार व एकादशी असा योग जुळून आल्याने भाविकांच्या गर्दीने संतनगरी फुलून गेली होती.
सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दुपारी दर्शनाची वेटिंग रांग तीन ते साडेतीन तासावर पोहचली होती. लाखोंच्या संख्येने आलेले भाविक नतमस्तक झाले. ‘गण गण गणात बोते’, ‘जय गजानन… श्री गजानन…’चा जयघोष केला.