Fri. Oct 2nd, 2020

शिफु संस्कृतीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सोशल साइट्सद्वारे तरुणींना जाळयात ओढून त्यांना वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यास भाग पाडणाऱ्या ‘शिफु संस्कृती’च्या संस्थापक सुनील कुलकर्णी याच्यावर दोन दिवसांत गुन्ह्या नोंदवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

 

वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असूनही पोलीसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले. एका सनदी लेखपालाच्या दोन मुली या शिफु संस्कृतीच्या जाळ्यात अडकल्याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याचं सांगते अखेर पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *