मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयात शिवथाळी

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महाविकासआघाडीने आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शिवभोजन योजनेचं शुभारंभ केला गेला.
या योजनेला पहिलाचा दिवशी भरभरुन प्रतिसाद मिळाला. दरम्यान प्रत्येक नागरिकाला आपल्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे, याबाबतची उत्सुकता लागली आहे.
मुंबई आणि उपनगरात कोणत्या ठिकाणी शिवभोजन मिळणार आहे, याची माहिती आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
मुंबईत एकूण 4 ठिकाणी तर उपनगरात 6 ठिकाणी शिवभोजन थाळी मिळणार आहे.
मुंबई उपनगराच्या हिशाला सर्वाधिक म्हणजे 1500 थाळ्या मिळाल्या आहेत. म्हणजेच दरदिवशी मुंबई उपनगरातील 1500 लोकांना थाळ्यांचा लाभ घेता येणार आहे.
तर मुंबई शहरातील एकूण 450 थाळ्या देण्यात आल्या आहेत.
मुंबई उपनगरात येथे मिळणार शिवभोजन
1 ) श्री. लॅन्सी अल्मेडा
व्यवस्थापक, मे. वनिता कॅटरर्स,
व्ही. एन. देसी रुग्णालय, सांताक्रुझ पूर्व, मुं-55
या केंद्रावर एकूण 150 शिवभोजन थाळ्या मिळणार आहेत.
2 ) हरिष तानिया बंगेरा,
व्यवस्थापक, मे. सत्कार कॅटरर्स, आर. एन. कुपर हॉस्पीटल, स्टाफ कॅन्टीन आणि हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महानविद्यालय, कॉलेज कॅन्टीन, जुहु, विलेपार्ले (प), मुं- 56
या केंद्रावर मिळणार 150 थाळ्या.
3 ) गणेश सीताराम शेट्टी
व्यवस्थापक, मे. गणेश फुड फोर्ट, 7 वा मजला, नवीन प्रशासन भवन (जिल्हाधिकारी कार्यालय), मुंबई उपनगर शासकीय वसाहत जवळ, वांद्रे (पूर्व) मुं-51
या केंद्रावर 100 थाळ्या मिळणार.
4) श्रीमती. जयश्री तानाजी कांबळे,
अध्यक्ष, मे. सरस्वती महिला बचत गट,
पालिका कामगार कॅन्टिन, तळमजला, एन वॉर्ड, पालिका ईमारत, जवाहर रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई.
150 थाळ्या.

5) श्रीमती. शालिनी सावंत
व्यवस्थापक, प्रथम महिला बचत गट, गाळा नं 1, औद्योगिक वसाहत, आय. बी. पटेल रोड जवळ, अमर जवान चौक, गोरेगाव पूर्व, मुं- 63
100 थाळ्या.
6) रघू बाबू पुजारी
वनिता कॅटरर्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युन्सिपल हॉस्पीटल, तळमजला, एस व्ही रोड, कांदिवली (प), मुं- 67
150 थाळ्या.
शिवभोजन योजना ही 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी 6 कोटी 48 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
दरम्यान शिवभोजन थाळीची मूळ किमंत ही 50 रुपये इतकी आहे. परंतु सामान्यांकडून केवळ 10 रुपये घेतले जाणार आहेत. तर उर्वरित 40 रुपये हे राज्य सरकार शिव भोजन केंद्र चालकाच्या खात्यात टाकणार आहे.
मुंबईत या ठिकाणी मिळणार शिवभोजन
मुंबई शहरात एकूण 4 ठिकाणी शिवभोजन मिळणार आहे. मुंबईला दररोज 450 थाळ्या मिळणार आहेत. या 4 केंद्रापैकी 3 केंद्र ही रुग्णालयात वा रुग्णालयाच्या जवळच्या परिसरात आहेत. त्यामुळे या केंद्राचा जास्तीत जास्त फायदा हा रुग्णांच्या नातेवाईकांना होऊ शकतो.

अशी आहे शिवभोजन थाळी
30 ग्रामच्या 2 चपात्या
100 ग्रॅम भाजीची वाटी
150 ग्रॅम भात
100 ग्रॅम वरण