कृष्णकुंजवर छत्रपती पुरस्कार विजेत्या मुलींचा सत्कार

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी छत्रपती पुरस्कार विजेत्या मुलींचा सत्कार करण्यात आला आहे. एकूण ३ मुलींचा कृष्णकुंजवर सत्कार केला आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा वायकर, हिमानी परब आणि अदिती दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
तर सायली गुढेकर, (वॉटर पोलो गोल्ड मेडल) यांचा देखील मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान १८ फेब्रुवारीला राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पुरस्कार जाहीर केले होते.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना छत्रपती पुरस्काराने गौरवण्यात येते.