Thu. Apr 22nd, 2021

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री आंबरनाथमध्ये घडला आहे. या हाणामारीत  5 जण जखमी झाले आहेत. तर  यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.यामध्ये महेश गोरे यांच्याही डोक्याला इजा झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा प्रकार घडल्याने आंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे.पूर्ववैमनस्यातून या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची चर्चा आहे.  याप्रकरणी चौघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

वाद होण्याचे नेमकं कारण काय ?

अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मीनगर परिसरात  शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

शिवसेनेचे नगरसेवक राजू शिर्के आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेश गोरे यांच्या गटात वाद झाला.

निवडणुकीपासून दोन्ही गटात  वाद सुरू असल्याने  याच वादातून दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली.
शाब्दिक चकमकीचं रुपांतर हाणामारीत  झाले आणि शिर्के गटाचे पाच जण जखमी तर एक गंभीर जखमी आहे.
या हाणामारीत महेश गोरे यांच्याही डोक्याला इजा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *