Wed. May 18th, 2022

शिवसेना-राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार

गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती असल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र आता या तिन्ही पक्षाची युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीचे प्रयत्न फसले असून शिवसेना-राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. त्यामुळे  गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत रंगत वाढली असून गुरुवारी गोव्यात उमेदवारांची घोषणा होणार आहे.

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘काँग्रेसचे म्हणणे आहे की, आम्ही आमच्या जीवावर गोव्यात निवडणूक जिंकू शकतो. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीशिवाय जर काँग्रेसने स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली तर ते एकही जागा मिळवू शकणार नाही’, असे ते म्हणाले.

1 thought on “शिवसेना-राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.