Tue. Jul 14th, 2020

मुंबई, नाशिकमध्ये शिवसेनेचा भाजपवर विजय

मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेने भाजपचा पराभव केला आहे. दोन्ही ठिकाणी नगरसेवकपदाच्या जागांवर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 141 मधून विठ्ठल लोकरे तर नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत.

मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 141 –

शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना मिळालेली मतं- 4427

भाजपच्या दिनेश पांचाळ यांना मिळालेली मतं- 3042

विठ्ठल लोकरे यांचा 1385 मतांनी विजय झाला आहे.

मानखुर्द वॉर्ड क्रमांक 141 साठी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विठ्ठल लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीत 25 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे 18 उमेदवारांमध्ये चुरस होती. शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांच्याबरोबर भाजपचे दिनेश पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, MIMचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पार्टीचे खान ज़मिर रिंगणात होते. मात्र विठ्ठल लोकरे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे.

नाशिक प्रभाग क्रमांक 26-

नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी भगवा फडकवला.

शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना काँग्रेस आणि NCP ने पाठिंबा दिला होता.

जाधव यांनी मनसे उमेदवार दिलीप दातीर यांचा पराभव केला. त्यांच्या विरोधातील भाजप तिसऱ्या क्रमांकावर गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *