Fri. May 14th, 2021

रावसाहेब दानवेंवरुन शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राडा

जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर शेतकरी आणि शिवसैनिकांनी भाजपविरुद्ध आंदोलन केले.

 

यावेळी डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेतर्फे भाजपा विरुद्ध निषेध मोर्चा काढून रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.

 

शिवसेनेच्या या कृत्याच्या निषेधार्थ भाजपने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाची होळी केली. तसेच भाजपाचे नगरसेवक महेश पाटीलांनी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब

चौधरींना शाई फासली.

 

त्याचा निषेध म्हणून शिवसेनेने गुरुवारी रात्री 11 वाजता डोंबिवलीत मोर्चा काढून दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच भाजप कार्यालयावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न

केला.

 

दरम्यान आरोपींना पोलिसांनी न पकडल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *