कोरोनाकाळात शिवसेनेचा दसरा मेळावा फक्त 50 जणांत
यंदाचा शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ५० जणांच्या उपस्थित…

कोरोनाच्या संक्रमणामुळे देशात तसेच राज्यातही अनेक सण उत्सव साध्या आणि सोप्या पध्दतीने साजरी करण्यात येत आहे तसेच यंदाची नवरात्री उत्सव देखील सोप्या पद्धतीने साजरी केली गेली होती.
२५ ऑक्टोबर म्हणजेच आज दसऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दसऱ्याच्या निमित्ताने टि्वटरवर लिहलं आहे की,”विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!”
यंदाचा शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ५० जणांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात ठेवता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सायंकाळी ७च्या सुमारास हा कार्यक्रम पार पडणार आहे.
तसेच शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये साजरा करण्यात येतो मात्र कोरोना संक्रमणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.