Sun. Oct 17th, 2021

ढोल- डफली घेऊन शिवसैनिक बँकांवर धडकले

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रत्येक शाखेबाहेर लावावी, या मागणीसाठी शिवसेनेनं ढोल बजाओ आंदोलन केले.

 

पुण्यातही जिल्हा सहकारी बँकेबाहेर ढोल-ताशा वाजवत शिवसैनिक धडकले. शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन छेडलं गेले.

 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन स्वीकारून यादी जाहीर करण्याचं मान्य केले.

 

आजवर कर्जमाफीचे तीन जीआर निघाल्याने कोणत्या निकषानुसार यादी लावायची यावर चर्चा झाल्यानंतर पहिल्या जीआरनुसार यादी जाहीर करण्याचं जिल्हा बँकेने

मान्य केले.

 

धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या जीआरच्या निकषानुसार अवघे पाच ते दहा टक्के तर तिसऱ्या जीआरनुसार पंधरा ते वीस टक्के शेतकरी कर्जमाफीस पात्र असल्याचा

दावा यावेळी बँकेकडून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *