Sat. Jul 4th, 2020

भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक,1 दिवसांची पोलीस कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमधील पोलीस मुख्यालय तोडफोडप्रकरणी भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंना अटक करण्यात आलीय. शिवाजीराव कर्डिले स्वत: पोलीस ठाण्यात गेले होते. याआधी कर्डिले यांचा जावई आमदार संग्राम जगताप यांना दुहेरी हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलीय. अहमदनगरमध्ये शनिवारी पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर, कार्यकर्ता वसंत ठुबेंची हत्या करण्यात आली होती.

यानंतर संतप्त शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत पोलीस मुख्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती. दरम्यान, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंना अटक करण्यात आलीय. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *